आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये “आयुर्वेदिक सहाय्यक” हा ६ महीन्याचा कोर्स करण्यासाठी इच्छुक (स्त्री व पुरुष) उमेदवारांकडुन निःशुल्क अर्ज मागविण्यात येत आहेत.

आयुर्वेदीक सहाय्यक” या कोर्स चे फायदे ,नियम व अटी –

१) कोणत्याही आयुर्वेदीक क्लिनिक मध्ये उपयोगी पडतील अश्या – रुग्णांशी संवाद कौशल्य ,आयुर्वेदिक औषधीकरण, औषधे तयार करुन रुग्णांना देणे, आयुर्वेदिक मसाज, पंचकर्म इ. आयुर्वेद शास्त्राशी संबंधित सर्व प्रक्रिया शिकविण्यात येतील.

२) सध्या आयुर्वेद उपचार पद्धती ही सरकार मान्य ,समाज मान्य अशी शास्त्रोक्त भारतीय उपचार पद्ध्ती म्हणुन नावारुपाला येत आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आयुर्वेद क्लिनिक्स तसेच हॉस्पिट्ल्स निर्माण होत आहेत. या सर्व ठिकाणी प्रशिक्षित असा स्टाफ असणे ही काळाची गरज आहे. आयुर्वेद शास्त्र हे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देत आहे. आयुर्वेद क्षेत्रात येणा-या काळात मानव संसाधनाची निकड लक्षात घेउन आम्ही परिपुर्ण आयुर्वेद ज्ञानाने युक्त असा “आयुर्वेद सहाय्यक” हा सहा महिने कालावधीचा कोर्स समाजातिल वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटामधील सर्व स्त्री व पुरुषांसाठी चालु वर्षात दि. १५ ऑगस्ट २०१९ पासुन सुरु करीत आहोत.

३) सदर “आयुर्वेदीक सहाय्यक ” हा कोर्स हा पुर्णपणे खाजगी तत्वावर असुन या कोर्सचा सरकारी आस्ठापनांमध्ये उपयोग होऊ शकणार नाही. मात्र खाजगी आयुर्वेदिक दवाखाने तसेच खाजगी आयुर्वेदिक हॉस्पिट्ल्स मध्ये नक्किच या कोर्सच्या सर्टिफिकेट वर तुम्ही पात्र होऊ शकता.(तुमचे कौशल्य गरजेचे).

४) सदर “आयुर्वेदीक सहाय्यक” कोर्ससाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही .सदरचा कोर्स हा पुर्णपणे निशुःल्क असुन विद्यार्थी संख्या सुद्धा मर्यादित असुन विहित कालावधीत अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीद्वारे परिक्षा झाल्यानंतरच यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाईल.

५)प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन कागद्पत्रांची पुर्तता करुन घेऊन पुढील ६ महीन्यांसाठी आमच्या “श्री विश्वतेज आयुर्वेद चिकित्सालय प्रा.लि” या संस्थेच्या नियम व अटींनुसार करार करण्यात येईल व हा करार सर्वांना बधंनकारक राहील.

६) सदर सहा महीन्याच्या कालावधीमधे प्रवेशीत विद्यार्थ्यांना /विद्यार्थीनींना प्रतिमहीना विशिष्ठ रक्कम ” शिकाऊ मानधन ” म्हणुन देण्यात येईल.

७) “आयुर्वेदीक सहाय्यक ” या पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी बारावी पास राहील.

८) पात्र उमेदवारांना स्वतःच्या राहण्याची , खाण्यापिण्याची व प्रवासाची सोय स्वतःलाच करावी लागेल. आमची संस्था त्यासाठी कोणतीही रक्कम देण्यास किंवा सदरची जबाबदारी घेण्यास बांधील राहणार नाही.

९) सदरचा कोर्स हा रोजगराची संधीची उपलब्धता म्हणुन तयार केलेला आहे. कोर्स पुर्ण झाल्यावर आमच्यातर्फे आमच्याशी संलग्नीत अश्या महाराष्ट्रभरच्या अथवा पुणे ,मुंबई,नाशीक,कोल्हापुर,नागपुर इ.ठिकाणीच्या आयुर्वेदिक क्लिनिक्स मध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये नोकरिसाठीची शिफारस आम्ही करू शकतो.

याव्यतिरिक्त अजुन माहीतिसाठी संपर्क करा….
डॉ. नितिन थोरात MD(Ayu)
श्री विश्वतेज आयुर्वेद चिकित्सालय प्रा.ली.
शॉप नं.५ ,शिव आरती सोसा. प्लॉट नं ७८ ,सेक्टर -१२,कृष्णा हॉटेल्जवळ ,कामोठे,नवी मुंबई. ४१०२०९
मोबा. ९८६७९८०७६९/९२२१५९६९७०.

विहित अर्ज नमुना- साध्या कागदावर लिखित स्वरुपात चालेल.

नाव –
संपुर्ण पत्ता-
मोबा.
Email-
शैक्षणिक पात्रता-
नागरिकत्व-

मुंबई /नवी मुंबई/ठाणे/पनवेल/खोपोली/अलिबाग /कल्याण कोकण या विभागातील इच्छुकांना प्राधान्य….

नोंद घेणे – “आयुर्वेद सहाय्यक” कोर्सचा संपुर्ण कालावधी झाल्यानंतर “Experience Certificate” व “Course Completion Certificate” देण्यात येईल.